पुणे येथे क्रिकेटचे प्रदर्शनाचे आयोजन   

पुणे :महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनआणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स, पुणे केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चउ॒ इंटरनॅशनल क्लब डिझाईन स्पर्धा प्रदर्शन हे क्रिकेट आणि वास्तुकलेमधील सर्जनशीलतेचा भव्य संगम ठरणार आहे. हे प्रतिष्ठित प्रदर्शन २६ व २७ एप्रिल २०२५ रोजी पंडित फार्म्स, पुणे येथे भरवले जाणार आहे.
 
या प्रदर्शनाचा उद्देश एमसीए इंटरनॅशनल स्टेडियम, गहुंजे, पुणे येथे उभारल्या जाणार्‍या जागतिक दर्जाच्या क्रीडा क्लबहाऊससाठी नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करणे हा होता. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेस देशभरातील व्यावसायिक आर्किटेक्ट्स आणि आर्किटेक्चर विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेसाठी एकूण १४५ प्रवेशिका प्राप्त झाल्या, ज्यामध्ये ९८ व्यावसायिक आणि ४७ विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व संकल्पनांमध्ये एक जागतिक दर्जाच्या क्रिकेट क्लबच्या दृष्टीने नाविन्यपूर्णता, उपयुक्तता, शाश्वतता आणि सामाजिक समावेशाचे विचार मांडले गेले. काउंसिल ऑफ आर्किटेक्चर यांच्या सहकार्याने आयोजित व आय .आय. ए. पुणे केंद्र यांच्या सहसंयोजनाने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी १० प्रथितयश आर्किटेक्ट्स व डिझाईन तज्ज्ञांच्या परीक्षक मंडळाने ३१ उत्कृष्ट संकल्पनांची निवड केली असून, त्यापैकी ११ अंतिम फेरीतील स्पर्धक ठरले आहेत. इंटरनॅशनल क्लब डिझाईन स्पर्धा प्रदर्शनाची घोषणा करताना मला अत्यंत आनंद होत आहे. क्रिकेट आणि वास्तुकलेच्या संगमातून निर्माण झालेल्या या उपक्रमाने एक अशा जागेची संकल्पना उभारली आहे जी केवळ खेळापुरती मर्यादित नसून ती सामाजिक बांधिलकी आणि उत्कृष्टतेची प्रेरणा देणारा केंद्रबिंदू ठरेल. 

Related Articles